जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणी केली कचराकुंडी

सातारा – सातारा जिल्हाधिकारी मुख्य कार्यलयासमोर कोणी केली कचरा कुंडी असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. स्वच्छता ही सेवा सांगताना सातारा जिल्ह्याचा गौरव स्वच्छ सातारा जिल्हा म्हणून करण्यात आला. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला गौरव निश्‍चितच प्रेरणादायी आहे. मात्र याचा विसर जाणीवपूर्वक पडला असल्याची ही घटना आहे. जिल्हाधिकारी कार्यलयाच्या जुन्या इमारतीचा मागील बाजूस तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य इमारती समोरील मोकळ्या जागेत.

उघड्यावर कचरा टाकण्याचे काम सुरु आहे. या परिसरात आता कचरा कुंडी नाही किंवा कचरा टाकण्यासाठी व्यवस्थाच नाही. सातारा जिल्ह्यातिल कारभाराचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वछता राखण्यासाठी जबाबदारी कोणाची? याची दखल घेतली जाणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

-Ads-

घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडी मध्ये देणे आवश्‍यक आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील सुका कचरा नक्की उघड्यावर का टाकला जातो. काही वेळेला हा कचरा जाळला देखील जातो अशी माहिती आहे. या कार्यालया समोरील असलेल्या झाडी मध्ये पंचायत समिती कार्यलयाच्या बाजूला देखील याच पद्धतीचा कचरा कायम टाकण्यात येत असल्याचे दिसते.

सुका कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, सरकारी कामकाजातील अनावश्‍यक कागद या स्वरूपातील कचरा याचा खच यात दिसतो. दैनंदिन स्वरूपात नगरपरिषदेच्या घंटा गाडी या परिसरातील साठणार सुका कचरा गाडीत दिल्यास अस्वच्छता उरणार नाही. त्यामुळे परिसराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित राहण्यास मदतच होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)