जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिमशक्ती संघटनेचे उपोषण

भुखंड वाटपाचे सात-बारे व कब्जापट्टी मिळण्याची मागणी

सातारा,दि.26 प्रतिनिधी- नागठाणे, ता. सातारा येथील सरकारी जागेपैकी प्रत्येकी 1 गुंठे जागा 14 लाभार्थींना देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देवून देखील अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने अखेर भिमशक्ती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास सुरूवात केली आहे.

-Ads-

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर नगर रचनाकार यांनी ले-आऊट काढून दिला आहे. जागेची पाहणी व पंचनामा प्रांतांकडून झालेला आहे. तसेच 29 सप्टेंबर रोजी 14 भुखंडाची मोजणी देखील झालेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सात-बारे व कब्जेप÷ट्टी देण्याचे आदेश काढावेत, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिरसट, राजरतन कांबळे, सुनिता ढवळे, वामनराव मस्के यांच्यासह पदाधिकारी व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)