सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) –
खासगी वाहनास प्रवेशबंदी असणाऱ्या ठिकाणी गाडी लावल्याप्रकरणी दंड केला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याने पोलिसांनाच बघून घेण्याची भाषा करत दमदाटी केली. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
कोणत्याही खासगी वाहनांना सातारा बसस्थानकात प्रवेश बंदी असताना जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या आशिष प्रकाश भिसे (वय 29 रा. गोळीबार मैदान, सातारा) त्याचा मित्र व जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत काम करणारा अतुल पांडुरंग जाधव हे बसस्थानकात फिरत होते. त्यावेळी त्याठिकाणी ड्युटी बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दंड भरण्याची विनंती केली. त्यावेळी मी कोण आहे माहीत आहे का? तुला जड जाईल असे म्हणत भिसे याने एका अधिकाऱ्याला फोन लावला होता. त्या अधिकाऱ्याने नियमानुसार दंड घ्यावा, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भिसे याला प्रवेश निषेध क्षेत्रात दुचाकी घातल्याने शंभर रूपये दंड केला. दंडाची पावती हातात पडताच बिथरलेल्या भिसे व जाधव यांनी तुला दाखवतो.साहेबांनी सांगून पण तू दंड केला आहेस, असे म्हणत संध्याकाळपर्यंत तुझी नोकरीच घालवतो. तुला बघुन घेतो असे म्हणत दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रवीण पवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)