जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

नगर, दि. 18 (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्‍यातील खिर्डी येथील गट नंबर 6 वरील अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कार्यवाही न केल्यामुळे हरिभाऊ डोमाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 17 पासून आमरण उपोषण चालू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
हरिभाऊ डोमाळे हे 18 मार्च 2016 रोजी ग्रामपंचायत, खिर्डी येथे उपोषणास बसले होते. परंतु, त्यांना खोटे पत्र देऊन उपोषण सोडले. त्यांना पत्राद्वारे सांगितले की, गट नंबर 6 हा सामाजिक वनीकरण विभागाला देण्यात आला आहे, असे खोटे लिहून देण्यात आले. त्यानंतर वनविभागाने असे लिहून दिले की, गट नंबर 6 आमच्याकडे नाही. त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून डोमाळे उपोषणास बसले होते. उपोषण 4 दिवस चालल्यानंतर संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्या समक्ष उपोषण सोडले होते.
ग्रामपंचायत सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांनी खोटे आश्‍वासन देऊन दोन वेळेस उपोषण सोडण्यास भाग पाडले. त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना डोमाळे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)