जिलेटीनच्या स्फोटाने उडविल्या बोटी

भीमा नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्यांवर महसुलची कारवाई

देऊळगाव राजे – देऊळगाव राजे व आलेगाव येथे भीमा नदीपत्रातून होणाऱ्या वाळूचोरीवर दौंड व श्रीगोंदा महसूल विभागाच्यावतीने कारवाई करून नऊ यांत्रिक बोटी व फायबर बोटी जिलेटींच्या सहाय्याने उडविण्यात आल्याचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले.

दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी संजय असवले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत तहसीलदार बालाजी सोमवंशी, श्रीगोंदाचे तहसीलदार महेंद्र माळी, मंडलाधिकारी संजय स्वामी, तलाठी अभिमन्यू जाधव, संतोष येडोळे, हरीचंद्र फरांदे, शंकर दिवेकर, सुनील जाधव यांनी सहभाग घेतला. आज सकाळी 10 वाजता महसूल विभागाने सुरू केलेल्या कारवाईत आलेगाव व देऊळगाव राजे नदीपात्रातील नऊ फायबर व यांत्रिक बोटी दौंड महसूल विभागाने जिलेटींच्या स्फोटाने उडवून दिल्या तर देऊळगाव राजे येथील के टी वेअर बांधऱ्याजवळ जिलेटीनचा स्फोट करणे धोकादायक असल्यामुळे तेथील चार फायबर बोटी महसूल अधिकाऱ्यांना उडविता आल्या नाहीत. श्रीगोंदा तालुक्‍यातील (जि. नगर) येथील काही फायबर व यांत्रिक बोटी श्रीगोंदा तहसीलदारांनी लिलावधारकाच्या असल्याचे सांगितल्यामुळे त्या बोटी सोडून देण्यात आल्या आहेत.

बोटी नदीत सोडल्याच कशा…
श्रीगोंदा तालुक्‍यातील लिलावधारकला यांत्रिक बोटी नदीपात्रात सोडण्याची परवानगी दिली कोणी? कारण, वाळू लीलाव देताना कोणत्याही यांत्रिक बोटीने वाळू उपसा करायचा नाही, अशी स्पष्ट अट असताना श्रीगोंदाचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी त्या लिलावधारकाला बगल दिलीच कशी, यावरून तहसील विभागाच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केली जावू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)