जिमला जाताय?

महिलांना तंदुरुस्तीसाठी एक्‍सरसाईज अत्यंत आवश्‍यक आहे. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी, आजारावर मात करण्यासाठी, फ्रेश माइंडसाठी, कमी असलेले वजन वाढवण्यासाठी किंवा जास्त वजन कमी करण्यासाठी देखील एक्‍सरसाईजचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी जिम जॉईन करणे सर्वोत्तमच पण, घरी अॅपच्या द्वारेही महिलांनी एक्‍सरसाईज केले तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी दूर होण्यास मदत होऊ शकते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, घरातील कामं करताना महिलांचं मन काहीसं त्रस्त होत असेल किंवा जीवनात तोचतोचपणाही येत असेल. मनात अनेक विचार सतावतात, डोक्‍याला अनेक टेन्शन असतात. काही महिला तर सततच्या आजारपणालाही कंटाळलेल्या असतात. घरातील साऱ्यांचं करता करता त्या महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ तरी असतो का? तर निश्‍चितच महिलांनी दिवसभरातून स्वत:साठी एक तास जरी वेळ काढला तरी पुरेसा ठरू शकतो. आपलं मन फ्रेश राहण्यासाठी महिला जिम जॉईन करून एक्‍सरसाईज करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकतात. आपल्या दिवसभराच्या कामाच्या व्यापातून महिलांनी स्वत:चं स्वास्थ्य जपण्यासाठी जिम जॉईन केल्यास निश्‍चितच त्या फ्रेश राहू शकतात आणि नेहमीच्या किरकोळ आजारपणापासून स्वत:ला लांब ठेवू शकतात.

आजकाल बऱ्याच महिला जिम जॉईन करतात. काहींना ते शक्‍य असतं, तर काहींना जिममध्ये रोज जाणं शक्‍य होत नाही. अशावेळी त्या महिला घरीदेखील एक्‍सरसाईज करू शकतात.

एका गृहिणीनी सांगितलं की, जिम जॉईन केल्यानंतर सहा महिन्यांत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी झालं. जिम जॉईन केल्याने बऱ्याच प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी दूर होतातच, शिवाय मन फ्रेश राहून आपल्या आहारात योग्य ते बदल केल्यास जिम जॉईन करण्याचे फायदे अनुभवास मिळतात.

महिलांना घरातील कामं करताना, सासू-सासरे, लहान मुलांचं करता करता थकवा येतोच. जिमच्या माध्यमातून एक स्फूर्ती मिळते. पर्सनॅलिटी डेव्हलप होते. प्रदूषणामुळे कृश त्वचेला तजेला मिळतो. आजारपणापासूनही बहुतांश सुटकाच होते व एक निरोगी जीवन जगता येते. मात्र, यामध्ये खंड न पडल्यास सर्वोत्तम. कारण महिलांना जिम जॉईन केल्यानंतर त्यात सातत्य आवश्‍यक असते. घरातही महिला याचा सराव करून सातत्य ठेवू शकतात.

जिममध्ये एक्‍सरसाईज करताना हार्टअॅटॅक सारखे प्रकार घडतात. अगदी तरुण मुलं-मुली याला बळी पडल्याने जिम जॉईन करणं चांगलं की वाईट असेही मुद्दे उपस्थित होताना दिसतात. तरुणवर्गामध्येही याची भीती दिसून येते. मात्र, आपल्याला एखादा आजार असेल, तर त्याची कल्पना जिममध्ये संबंधितांना सर्वप्रथम देणे गरजेचे असते. त्यावर त्या व्यक्तीला प्रशिक्षण कसं द्यावं ते ठरवणं सोपं जाऊ शकतं.

जिम प्रकारामध्ये कीक बॉक्‍सिंग, वेट लिफ्टिंग, कार्डिओ, स्कॉच, पूश अप, सूर्य नमस्कार, रनिंग, जंपिंग आदी प्रकार शिकवले जात असल्याचे सलमाने सांगितले. हे बेसिक प्रकार असून ज्यावेळी एखादी वृद्ध महिला जिममध्ये प्रवेश घेते, तेव्हा प्रथम त्यांच्या आजारपणाची चौकशी करूनच त्यांना जिमचे प्रकार शिकवले जातात.

एखाद्याला हाय ब्लड प्रेशर असेल, तर त्या व्यक्तीला एक्‍सरसाईज देतेवेळी ब्रेक देऊन हे प्रकार शिकवले जातात. फास्ट-स्लो-फास्ट अशाप्रकारे. तसेच ज्या वृद्ध महिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ज्यांच्या गुडघ्यांमध्ये गॅप आहे, तसेच ज्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे, अशा महिलांना ट्रेड मिल, रनिंग, जंपिंग असे एक्‍सरसाईजचे प्रकार दिले जात नाहीत. त्यांच्या आरोग्यानुसार काळजी घेऊन त्यांना एक्‍सरसाईजचे प्रकार शिकवले जातात.

जिममध्ये महिलांना योगासनांचे प्रकार, तसेच झुंबा प्रकारही शिकवला जातो. हा प्रकार डान्ससारखा असतो. ज्यामध्ये एक तास नाचायचे. योगामध्ये आसन प्रकार शिकवले जातात.

एक्‍सरसाईज करताना आहाराची पुरेपूर काळजी घेणे गरजेचे असते. आहाराच्या ठरावीक वेळा पाळून एक्‍सरसाईज केल्यास त्याचे योग्य परिणाम दिसून येतात. जेवणानंतर 1 ते 2 तासानंतर एक्‍सरसाईज करणे योग्य.

जिम करणाऱ्या महिलांसाठी आहारामध्ये नाश्‍त्यासाठी सकाळी ओट्‌स, दिवसातून दोन सफरचंद, दूध, फळांमध्ये कलिंगड वर्ज्य, 1 केळे, 6 अंडी, दररोज 25 किंवा 50 ग्रॅम चिकन, आदींचा समावेश करणे आवश्‍यक आहे. तर जेवणामध्ये दुपारी 1 वा. दोन चपात्या आणि रात्री 8 वा. दोन चपात्या. यावेळी भात, इडली आदी पदार्थ वर्ज्य केले जातात. तसेच नियमित प्रोटीन, कॅल्शियमचा वापर करू शकतात. त्यामुळे रिकव्हरी व्हायला मदत होते. तसेच तंदुरुस्तीसाठी प्रोटीन हितावह ठरते. घरगुती व्याप थोडा बाजूला सारून महिलांनी जिम जॉईन केले तर हितावह ठरू शकते.

– मनीषा सक्‍सेना 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)