जिमनॅस्टिक्‍समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली पदकांची लयलूट

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे : जिम्नॉस्टिक्‍समध्ये महाराष्ट्राच्या श्रेयाला रौप्य ; क्रिशाला ब्रॉंझ

पुणे: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे जिम्नॅस्टिक्‍समध्ये गुरुवारी कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी पाच सुवर्ण, चार रौप्य व पाच ब्रॉंझपदकांची लयलूट करीत उल्लेखनीय यश मिळविले. महाराष्ट्राच्या श्रेया भंगाळे हिने जिम्नस्टिक्‍समधील वैयक्तिक सर्वसाधारण ऍपेरेटस प्रकारात रौप्यपदक मिळविले तर तिची सहकारी क्रिशा छेडा हिला याच प्रकारात ब्रॉंझपदक मिळाले. सतरा वषार्खालील गटाच्या या स्पर्धेत जम्मू व काश्‍मिर संघाच्या बावलीन कौर हिने सोनेरी कामगिरी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बावलीन हिने 43.40 गुणांची कमाई केली. श्रेया हिला 39.70 गुण मिळाले. श्रेया ही ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया प्रशालेत शिकत असून तिचे हे पहिलेच पदक आहे. ती पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. क्रिशा ही मुंबईतील जयहिंद महाविद्यालयात शिकत असून ती प्रीमिअर रिदमिक जिम्नॅस्टिक्‍स अकादमीत सराव करते. तिला वर्षा उपाध्ये व क्षिप्रा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. क्रिशा हिने गतवर्षी खेलो इंडिया स्पधेर्तील ऍपेरेटसपैकी चेंडू प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.

श्रेया हिने रौप्यपदकाबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले, माझी ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. येथील वातावरण खरोखरीच सर्वांना भारावून टाकणारे आहे. क्रिशा म्हणाली, ब्रॉंझपदकामुळे मला खूप समाधान झाले आहे. येथील स्पर्धा खूपच चुरशीची होती हे लक्षात घेतल्यास माझी कामगिरी आनंददायीच आहे.
मुलींच्या 17 वषार्खालील गटात श्रेया भंगाळे (चेंडू रचना), क्रिशा छेडा (हूप), सिद्धी हत्तेकर (असमांतर बार) यांनी सोनेरी कामगिरी केली.

मुलांमध्ये मनेश गाढवे याने पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तो मुंबई येथील प्रगती महाविद्यालयात शिकत असून गतवर्षी त्याने खेलो इंडियात याच प्रकारात विजेतेपद मिळविले होते. त्याला नंदकिशोर तावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ठाण्याचा श्रेयस मंडलिक याने रिंग्ज प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्याने आणखी एक रौप्य व एक ब्रॉंझपदकाची भर घातली. तो महेंद्र बांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असतो. त्याची ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा आहे.

सविस्तर निकाल –
17 वर्षाखालील मुली – चेंडू रचना – 1.श्रेया भंगाळे, महाराष्ट्र (12.85 गुण), 2.बावलीन कौर, जम्मू व काश्‍मिर (12.35गुण), 3. क्रिशा छेडा, महाराष्ट्र (10.70 गुण). बीम-1.प्रतिक्षा समंता, पश्‍चिम बंगाल (11.40 गुण), 2.प्रियंका दासगुप्ता, त्रिपुरा (11.35 गुण), 3.रिद्धी हत्तेकर, महाराष्ट्र (10.45 गुण). हूप-1.क्रिशा छेडा, महाराष्ट्र (11.45गुण), 2. बावलीन कौर, जम्मू व काश्‍मिर (11.40 गुण), 3.आयुषी अगरवाल, दिल्ली (8.55 गुण). टेबल व्हॉल्ट-1.प्रतिक्षा समंता, पश्‍चिम बंगाल (12.875 गुण), 2.प्रियांका दासगुप्ता, त्रिपुरा (12.175 गुण), 3.सोहम नाईक, महाराष्ट्र (11.825 गुण). असमांतर बार-1.सिद्धी हत्तेकर, महाराष्ट्र (8.55 गुण), 2.मयुरी अईर, महाराष्ट्र (8.50 गुण), 3.अनन्या अगरवाल, दिल्ली (8.15 गुण). आरजी क्‍लब्ज-1.बावलीन कौर, जम्मू व काश्‍मिर (13.30गुण), 2.अनन्या सोमण, महाराष्ट्र (10.85 गुण), 3.क्रिशा छेडा, महाराष्ट्र (10.70 गुण)

मुले-फ्लोअर एक्‍झरसाईज – 1.महंमद रफी, उत्तरप्रदेश (12.40 गुण), 2.तुषार कल्याण, दिल्ली (12.35 गुण), 3. श्रेयस मंडलिक, महाराष्ट्र (12.30 गुण). पॉमेल हॉर्स-1.मनेश गाढवे, महाराष्ट्र (10.800 गुण), 2.श्रेयस मंडलिक, महाराष्ट्र (10.250 गुण), 3.अंकुर शर्मा, उत्तरप्रदेश (10.250 गुण). टेबल व्हॉल्ट-1.महंमद रफी, उत्तरप्रदेश (12.075 गुण), 2.जगदीश बरीक, ओडिशा (11.950 गुण), 3.विशाल जाधव, तेलंगणा (11.950 गुण), रिंग्स – 1. श्रेयस मंडलिक, महाराष्ट्र (10.90 गुण), 2. तुषार कल्याण, दिल्ली (10.65 गुण), 3. राज यादव, उत्तरप्रदेश (10.35 गुण), समांतर बार – 1. जतिनकुमार कनोजिया, उत्तरप्रदेश (12.100 गुण), 2. श्रेयस मंडलिक, महाराष्ट्र (11.500 गुण), 3. राज यादव, उत्तरप्रदेश (11.500 गुण).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)