जिमच्या साहित्यऐवजी खेळाचे साहित्य द्या

महापौरांचा मुख्यसभेत नगरसेवकांना सल्ला


महापालिका शाळांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

पुणे – नगरसेवकांनी जिमच्या साहित्यावर पैसे खर्च करण्याऐवजी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी महापालिका मुख्यसभेत दिला.

महापालिका शाळातील गुणवत्तावाढीसंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर खासगी कंपनीला पाहणी करण्याचे अधिकार देण्यासंदर्भात महापालिकेच्या मुख्यसभेत प्रस्ताव आला होता. त्यावर सदस्यांनी महापालिका शाळांसंबंधीचे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर महापौरांनी वरील सल्ला दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळांच्या आवारातील, गेटसमोरील अतिक्रमण, शाळांची सुरक्षा, गुणवत्तावाढ, शिक्षण समितीची स्थापना, शिक्षकांची अपुरी संख्या, पटसंख्या यावर सदस्यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. गुणवत्ता तपासण्यापेक्षा त्यात वाढ कशी होईल याचा आधी विचार करा, असेही सदस्यांनी यावेळी सुचवले.

सदस्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करत त्रुटी दूर करण्यात येतील. मॉडेल स्कूल संदर्भात सभेपुढे अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षण विभाग प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सभागृहात दिले.

या चर्चेनंतर महापौरांनी खेळाच्या साहित्याबाबत सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, शाळातील गुणवत्ता वाढली पाहिजे यात कोणाचेच दुमत नाही. नगरसेवकांनी प्रभागात ठिकठिकाणी जिमसाठी साहित्य खरेदी करण्याऐवजी ते पैसे महापालिका शाळांमध्ये खेळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी खर्च करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)