जिद्द, चिकाटी अन्‌ परिश्रमात सातत्य ठेवल्यास यश निश्‍चित

वाई ः मार्गदर्शन करताना खा. उदयनराजे भोसले समवेत आ. मकरंद पाटील, विजयसिंह पिसाळ, शशिकांत पिसाळ, विनायक वेताळ, अनिल सावंत, अजित टिके, डी. एम. फडतरे, सौ. निलम फडतरे, सौ. अरुणादेवी पिसाळ, उमेश रुपनवर व इतर.

मोफत पोलीस प्रशिक्षण शिबिरात खा. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन
वाई, दि.3 (प्रतिनिधी) – ध्येय निश्‍चित करून जिद्द, चिकाटी व प्रयत्नातील सातत्य यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हवे ते पद मिळवू शकता. ज्याला वेळेचे महत्व कळते तो आयुष्यात यशस्वी होतो. संधी एकदाच मिळते. मिळालेल्या संधीचा व वेळेचा सदुपयोग करणारे निश्‍चित यशस्वी होतात, असे उद्‌गार खा. उदयनराजे भोसले यांनी काढले.
विजयसिंह पिसाळ युवा मंचच्यावतीने येथील शेतकरी बहुउद्देशीय हॉलमध्ये आयोजित पोलीस भरती मोफत मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, सेवानिवृत्त पोलीस सहआयुक्त डी. एम. फडतरे, पोलीस उपअधिक्षक अजित टिके, पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, सौ. निलम फडतरे, सह्याद्री ऍकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शारदा ननावरे, मदन भोसले, महादेव मसकर, विजयसिंह नायकवडी, विकास शिंदे, सयाजी शिंदे, नितीन मांढरे, विजयसिंह पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, स्व. मदनआप्पांचा सामाजिक कार्याचा वारसा शशिकांत दादा व विजयसिंह पिसाळ पुढे चालवित आहेत. तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते आयुष्याचे सोने करु शकतात. त्यांना करिअरसाठी योग्य मार्गावर नेण्यासाठी आयोजित केलेले हे शिबिर कौतुकास्पद आहे. स्वकर्तृत्वावर मोठे होणाऱ्यांना समाजात मानाचे स्थान मिळते. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांना जग स्मरणात ठेवते. त्यामुळे स्वतःला कमी न लेखता जिद्द आणि अथक परिश्रमांच्या बळावर तुम्ही निश्‍चित मोठी पदे मिळवू शकता, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कसलेही सहकार्य लागले तर कधीही हाक मारा मी सदैव मदतीसाठी तत्पर असेन, असेही उदयनराजे म्हणाले.
आ. मकरंद पाटील म्हणाले, जेवढी कठीण परिस्थिती असते तेवढीच लढण्याची संधी जास्त असते. त्यामुळे तरुणांनी परिस्थिती, समाज, आर्थिक स्थिती कशाचाही विचार न करता चिकाटीने व जिद्दीने आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. भरतीचे अर्ज सुटल्यानंतर तयारीला न लागता आपले ध्येय ठरवून त्या दृष्टीने सातत्याने अभ्यास सुरू ठेवा. तयारी करत रहा. नक्की काय व्हायचे आहे हे लक्षात ठेवून त्यादृष्टीने प्रयत्नांना सुरूवात करा. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल.
यावेळी डी. एम. फडतरे, अजित टिके यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर 2017 मध्ये पोलीस दलात भरती झालेल्या युवकांचा तसेच नवनियुक्त पोलीस पाटलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात उमेश रुपनवर यांनी तरुणांना पोलीस भरतीविषयी सखोल मार्गदर्शन केले.
विजयसिंह नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन केले. पप्पूराजे भोसले, अमृत कुंभार, सतीश कुदळे आदींनी स्वागत केले. विजयसिंह पिसाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विक्रांत डोंगरे, अुॅड. जगदीश पाटणे, विजय गायकवाड, सदाशिव पिसाळ, निशिकांत डावळकर, अजय शिर्के, सचीन वायदंडे, चंद्रकांत भोसले, संदीप मानकुमरे, सचीन मानकुमरे, आदींसह शेकडो तरुण, तरुणी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)