जिद्द अन्‌ कठोर परिश्रमाने यशाचे शिखर गाठणे शक्‍य

काशीळ ः यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना हेमंत पाटील व मान्यवर.

राष्ट्रीय भ्रष्टचार जनशक्तीचे हेमंत पाटील यांचे उद्‌गार
काशीळ, दि. 26 (वार्ताहर) – जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठणे अवघड नाही, असे गौरवोद्‌गार राष्ट्रीय भ्रष्टाचार जनशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
काशीळ, ता. सातारा येथील यशवंत हायस्कूल मधील इयत्ता 10 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सुभाष सेठ जाधव, जनता सहकारी बॅंकेचे संचालक बाळासो लोहार, रणजित कौर, गडोख विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे, युवा नेते धनंजय तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेमंत पाटील पुढे म्हणाले, या शाळेतील संस्कृती पवार, श्वेता काटे, प्राची कोळेकर, वैभवी घाडगे, त्रिलोक माने इत्यादी विद्यार्थ्यांसह वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी 10 वी च्या परीक्षेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या जिद्द आणि परिश्रमाने शाळेचा 100 टक्के लागलेला निकाल अभिनंदनीय असून गौरवास पात्र असाच आहे. माझ्याकडून अनेक ठिकाणी विद्ययार्थ्यांचा सत्कार होत असतो. मात्र, आजचा माझ्या गावातील विद्यार्थ्यांचा सत्कार माझ्या हातून होणं हे मी माझं भाग्य समजत असून या शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा मला नेहमीच अभिमान राहील, असे मत यावेळी हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपसरपंच दीपक माने, ग्रा. सदस्य अंकुश सूर्यवंशी, सौ. कामिनी तळेकर, तसेच अशोक पवार, सुहास जाधव, पांडुरंग जाधव, दीपक जाधव, भीमराव तळेकर, कांताताई माने आदी मान्यवरांसाह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जे. एच. माने, यांनी केले तर उपस्थितांचे आभार धनंजय तळेकर यांनी मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)