जिद्दीने अभ्यास केल्यास यश नक्कीच – सुकुमार बोरा

शिक्रापूर -सध्या शाळेमधून सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडत असून शालेय मुलांनी शिक्षण घेत असताना शिक्षणाकडे व अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज असून जिद्दीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते, असे मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेने गणेशोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत असताना बोरा बोलत होते. याप्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तुळशीराम परदेशी, शालेय कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बोरा, राजेंद्र भेटवरा, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सासवडे, जयश्री दोरगे, रोहिणी गिलबिले, राजेंद्र मांढरे, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल सोंडे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, आशिष कापरे, विद्याधाम प्रशालाचे प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य रामदास शिंदे, बाबुराव कोकाटे, सुनील दिवटे, संदीप परदेशी, दिगंबर नाईक, गणपती उत्सव अध्यक्ष सुनील जानकर, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सतीश इंगळे यांसह आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना बोरा पुढे म्हणाले, सध्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जात असल्याने मुलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. या माध्यमातून शाळेमधून अनेक विद्यार्थी घडत आहेत. शालेय मुलांनी अभ्यासाबरोबर त्यांच्यातील विविध स्तुत्य गुणदेखील दाखविणे गरजेचे असल्याचे बोरा यांनी सांगितले. यावेळी बोलताना शिरूर तालुक्‍यातील टाकळी भिमातील मुलीचे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून तालुक्‍याचे नाव उंचाविण्याचा मान मिळविला आहे. तिचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेत शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मांढरे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी केले व उपप्राचार्य रामदास शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)