जितेंद्र बिडवई यांचा सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सन्मान

जुन्नर- महाराष्ट्र राज्याचे कृषी-पणन व फलोत्पादन, स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जुन्नर तालुक्‍यातील डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांचा त्यांच्या संस्थेने ग्रामीण भागांत राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत प्रजासत्ताक दिनी जळगाव येथे सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व अकरा हजारांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. बिडवई हे लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त असून अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग असतो. या संस्थेने ससंस्कार स्वच्छते’चा या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सुमारे 80 शाळांना स्वच्छता किटचे वाटप केले आहे. या किटमध्ये कचरापेट्या, झाडू, खराटे, हॅंडवॉश आदी 24 प्रकारच्या विविध स्वच्छतेबाबत वस्तूंचा समावेश आहे. महिन्यातील एका शनिवारी या शाळांच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या स्वच्छता फेरीप्रसंगी या संस्थेचे प्रतिनिधी हजेरी लावतात. त्याचप्रमाणे ‘किटक नाशकांचा सुरक्षित वापर’ या अभियानांतर्गत अनेक गावांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून मोफत संरक्षण पोशाख वाटण्यात आल्याची माहिती बिडवई यांनी दिली. जुन्नर तालुक्‍यातील सुमारे 95 शाळांमधील किशोरवयीन मुलींना “कळी उमलताना’ या कार्यक्रमांतर्गत इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकीनचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)