जितेंद्र आव्हाड पुन्हा “मातोश्री’वर 

उद्धव ठाकरेंची घेतली भेट ः राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा 

मुंबई: राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज “मातोश्री’ वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल एक तास चर्चा केली. आव्हाड यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण ठाकरे यांना दिल्याची माहिती आहे. ठाकरे यांच्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना आमंत्रण दिले जाणार आहे.

अजित पवार यांनी कालच महाघाडीत शिवसेना येण्याचा प्रश्न नाही हे स्पष्ट केले होते. त्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आव्हाड यांनी 20 दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र या दोघांची भेट नेमक्‍या कोणत्या कारणासाठी हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

आव्हाड हे विरोधी पक्ष अर्थात राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. विशेषत: शिवसेनेच्या भूमिकेवर ते नेहमीच सडकून टीका करतात. मात्र तेच जितेंद्र आव्हाड एका महिन्याभरातच दोनदा “मातोश्री’वर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीच्या दृष्टीने कॉंग्रेसशी चर्चा सुरुच आहे. शिवाय भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याबाबतची भूमिका पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आव्हाड-ठाकरे भेट होती का? असा प्रश्न आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील जवळीकतेविषयी मोठी चर्चा झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)