जिठूम्बा वस्ती दोन महिन्यांपासून अंधारात

नायगाव: पुरंदर तालुक्‍यातील राजुरी येथील जिठूम्बा वस्तीवर वादळी वाऱ्यामुळे विजेचे चार खांब पडलेले आहेत. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून वस्तीतील लोक अंधारात आहेत.
लाईट नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही. राजुरी गावचे उपसरपंच विपुल भगत यांनी महावितरणला याची माहिती दिली होती. तरी देखील महावितरणचे अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. लवकरात लवकर गावातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. महावितरणचे सासवड विभागाचे उपकार्यकरी अभियंता सुरेश कामथे यांनी सांगितले की, आठ दिवसांत काम पूर्ण केले जाईल. काही अडचणी आल्यास नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना त्वरित कळवावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)