जिजामाता विद्यालयात आजी-आजोबा दिवस उत्साहात

जेजुरी- येथील जिजामाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या पालकांचे स्वागत जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ, गीत, नाट्य सादर करून आजी-आजोबांना मोहून टाकले. कार्यक्रमात आजी-आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नातवंडानी आपल्या आजी-आजोबांना कधीही अंतर देणार नाही. त्यांच्यासाठी वेळ देऊ, त्यांची सेवा करू, त्यांच्यावर प्रेम करू असे सांगत जन्मभर सांभाळ करण्याची शपथ घेतली. यावेळी बी. एम. काळे, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील, माध्यमिक विभागप्रमुख कैलास शिर्के, पोपट राणे, प्रल्हाद गिरमे, सोमनाथ उबाळे, बाळासाहेब जगताप व वर्षा देसाई उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)