जिजामाता विद्यालयातील स्नेहमेळाव्यात सवंगड्यांनी साधला संवाद

नेवासा – 21 व्या शतकामध्ये देशाची सर्व प्रगतीची धुरा युवा पिढीच्या खांद्यावर आहे. आज देशासाठी अनेक युवक-युवतींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले नाव कोरले असून, अनेक जणांनी यशाला गवसणी घातली आहे. काहींनी यशाची शिखरे पादाक्रांत करीत स्वबळावर यश मिळविले आहे. या यशाच्या शिखरावर परिस्थितीवर मात करीत उन्नतीकडे किंवा त्या दिशेने प्रयत्नशील आहेत. भविष्याकडे वाटचाल करीत असताना युवक-युवतींनी भूतकाळाकडे थोडे पाहिले तर ज्या ज्ञानगंगोत्री समाज मंदिरात जगण्याची दिशा दाखविली तिला निश्‍चितच विसरून चालणार नाही, असा संवाद जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 1999 ते 2000 च्या 10 वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात उपस्थितांना ऐकावयास मिळाला.

यावेळी अजित धस, सोनिया खंडागळे, कृष्णा काशिद, विजय आवारे, सचिन निकम, रितेश घनवट, नितीन महाराज मते, तहसीलदार राजेंद्र नजन, समीर पठाण, शरद गिलबिले, बाळू डोंगरे, पोपट कोळसे, गणेश धुमाळ, डॉ. जावेद शेख, सोमनाथ काळे, विजय चौधरी, गणेश बोडखे, आदी उपस्थित होते. परिस्थितीवर मात करीत अनेकांनी शिक्षण घेतल्याचा विशेष उल्लेख या स्नेहमेळाव्यानिमित्त संवादादरम्यान करण्यात आला. आज या विद्यालयातील विद्यार्थी शेती, शिक्षण, राजकारण, समाजकारण, प्रशासन, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नावलौकिक मिळवीत आहेत. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. मात्र, या स्नेहमेळाव्यास हे सवंगडी आवर्जुन उपस्थित राहिले होते. या सर्व सवंगड्यांना एकत्र आणण्यासाठी कृष्णा काशिद, सोनिया खंडागळे, अजित धस यांनी विशेष परिश्रम घेतले व संवाद घडवून आणला.
नेवासा तालुक्‍यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 1999-2000 च्या 10 वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या वतीने यापुढील काळात विद्यालयास मदत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे, तसेच याच बॅचमधील काही मित्रांना मदत केली जाणार आहे. अनेक वर्षांनी हे मित्र एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या भावना ओथंबून आल्या होत्या. जुन्या दिवसांच्या आठवणी काढत प्रत्येकजण त्यामध्ये रममाण झाला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)