जिजाऊ इन्स्टिट्यूटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

रेडा- विश्व प्रतिष्ठान इंदापूर संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट इंग्लिश मिडियम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कालठण क्रमांक 1 येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. याचे उद्‌घाटन डॉ. श्रेणिक शहा सपत्निक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर गटकुळ हे अध्यक्षस्थानी होते. संगिता शहा, लक्ष्मण गुणवरे, राहुल गुंडेकर, प्रा. डॉ. महादेव शिंदे, अनिल जाधव, दादासाहेब गलांडे, निलेश केमदाने, डॉ. महेश जगताप, संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. जयश्री गटकुळ, प्राचार्या राजश्री जगताप उपस्थित होते.
यावेळी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने देशभक्ती, लोकगीत, लावणी, दांडिया नृत्यसादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. श्रेणिक शहा यावेळी म्हणाले की, ज्ञानदानाने विद्यार्थी घडतो. युवापिढी सुज्ञान, सजग, सक्षम करण्यासाठी शिक्षकाचे योगदान महत्त्वाचे ठरते. शिक्षित आणि सुसंस्कारित युवापिढीच भारत देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करु शकेल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी वर्षभरामध्ये घेतलेल्या उपक्रमामधील सहभागी विद्यार्थी व पालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. जयश्री गटकुळ यांनी विश्व प्रतिष्ठान अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था कार्यरत आहे. शिक्षण जगातील सामर्थ्यशाली भांडवल असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भवितव्य निर्माण करून समाजापुढे आदर्श घडवला तर, युवक दीपस्तंभ म्हणून भावी पिढीला दिशा देण्याचे कार्य करू शकता. सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय चोरगे व प्रा. आशा जगताप यांनी केले. प्रा. शिशिर जगताप यांनी आभार मानले.

What is your reaction?
5 :thumbsup:
4 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)