जिग्नेश मेवानींना जयपूर विमानतळावर दोन तास रोखले

जयपुर – गुजरात मधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांना राजस्थान पोलिसांनी जयपुर विमानतळावर दोन तास रोखून धरले. त्यांच्यावर राजस्थानात 15 एप्रिल ते 30 एप्रिल या अवधीत कोठेही जाहीर सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ते नागोर जिल्ह्यात एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी जयपुरला आले होते.

या प्रकाराबद्दल राजस्थानातील वसुंधरा राजे सरकारवर जोरदार टीका करून जिग्नेश यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या सारख्या दलित लोकप्रतिनिधींचे येथे हे हाल होत असतील तर सामान्य दलितांची या राज्यातील स्थिती काय असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्याला घटनेने देशात कोठेही फिरण्याची व जाहीर सभा घेण्याची अनुमती असताना राज्य सरकारने घटनेचा भंग करून आपल्यावर ही बंदीची कारवाई केली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

आपल्यावर लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधाच्या नोटीशीवर पोलिसांनी जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. नंतर पोलिसांनी त्यांना जयपुर शहरात प्रवेश करण्यास अनुमती दिली परंतु त्यांना नागौर जिल्ह्यात प्रवेश करण्यास अनुमती नाकारण्यात आली. जयपुर शहरातील आपल्या हालचालींबाबत पोलिसांशी सतत संपर्कात राहण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)