जिग्नेश मेवाणी आज पुण्यात ; ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात

पुणे- पुण्यातील शनिवारवाड्यावर आज होणा-या ‘एल्गार परिषदे’ला गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी पुण्यात दाखल झाले आहेत. आज सकाळी त्यांनी भिमा कोरेगाव गावाला भेट दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर आज दुपारी मेवाणी शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत शनिवारवाड्यावर होत असलेल्या एल्गार परिषदेला उपस्थिती लावणार आहे.

या परिषदेला सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश पी. बी. सावंत, अॅड. प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी, रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, उमर खालिद, उल्का महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहरी आदी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-

दरम्यान, जिग्नेश मेवाणी यांच्या उपस्थितीत होणा-या एल्गार परिषदेला पेशव्यांच्या वंशजासह समस्त हिंदू आघाडीचा विरोध कायम आहे. त्यामुळे शनिवारवाडा परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे की, एल्गार परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्ती सहभाग घेणार आल्याचे समजते. त्यामुळे हा कार्यक्रम जर राजकीय असल्यास नियमाप्रमाणे परवानगी देणे शक्‍य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमांनुसार नसल्यास यांची परवानगी नाकारण्याच्या सूचना प्रशासनला दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)