जिगरबाज वाहतूक पोलिसाने दुसऱ्या आरोपीस केले जेरबंद

जिगरबाज वाहतूक पोलिसाने दुसऱ्या आरोपीस केले जेरबंद
मालधक्का चौकातील थरार; वाहतूक पोलिसाच्या दिशेने गोळीबार

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 21 – चंदननगर येथे महिलेचा खून केल्यानंतर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर पुणे रेल्वे स्थानकात गोळ्या झाडून पळणाऱ्या आरोपीस वाहतूक पोलिसाने धाडसाने पकडले. आरोपीने अंगावर पिस्तूल रोखून हवेत गोळबार केल्यावरही त्यास झडप घालून पकडले. यामुळे बंडगार्डन वाहतूक विभागातील राजेश शेळके या कर्मचाऱ्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

रेल्वे स्थानकावरील एका आरोपीस पोलिसाने ताब्यात घेतल्यावर दुसरा आरोपीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार केला. ते गंभीर जखमी झाल्यावर आरोपी पिस्तूलासह पसार झाला. दरम्यान गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग सुरु केला. यावेळी आरोपी मालधक्का चौकातून पिस्तूल घेऊन पळत जात होता. त्याचा माग काढणाऱ्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड उगारत थांबवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मालधक्का चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या बंडगार्डन वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई राजेश शेळके यांनी पाहिली. त्यांनी तात्काळ आरोपीच्या दिशेन धाव घेतली. यावेळी आरोपी जवळील ‘आशा’ इमारतीत घुसला. तेथे तो जिन्यातच घुटमळत होता, दरम्यान शेळके व गुन्हे शाखेचा कर्मचाऱ्याने जिन्यात धाव घेताच, त्याने हवेत गोळीवर केला. यामुळे दोघेही एक पाऊल मागे आले.

दरम्यान ही घटना नागरिकांना कळाल्याने अनेक जण हातात दगड घेऊन त्याला मारण्यासाठी धावत आले होते. इमारतीच्या बाहेर पडता न आल्याने त्याने एका पत्र्याच्या शेडवर उडी मारली. शेळके यांनी तेथे धाव घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सातत्याने पिस्तूल रोखून होता. यामुळे चिडलेल्या काही नागरिकांनी त्याला दगडे मारुन जखमी केले. तरीही तो पिस्तूल टाकून देण्यास तयार नव्हता. अखेर शेळके यांनी त्याला पिस्तूल टाकले तरच नागरिक दगडे मारणे थांबतील असे समजावून सांगितले. यामुळे अखेर त्याने अखेर पिस्तूल खाली टाकले. यानंतर त्याला झडप टाकून पकडण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
915 :thumbsup:
98 :heart:
12 :joy:
36 :heart_eyes:
78 :blush:
5 :cry:
8 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)