जिओ इंस्टिट्यूट शोधा व अकरा हजार बक्षीस मिळवा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून शहरात फ्लेक्‍स
पुणे, दि.11 – पुण्यात “जिओ इंस्टिट्यूट शोधा व अकरा लाख पैशांचे बक्षीस मिळवा’ असे फ्लेक्‍स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. अस्तित्त्वातच नसलेल्या जिओ इंस्टिट्यूटला केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने उच्च शिक्षण संस्थेचा दर्जा दिल्यानंतर सर्वच स्तरातून याबाबत टीका होत आहे.

जिओ इंस्टिट्यूट सापडली नाही तर, जावडेकर यांनी राजीनामा द्यावा. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा इंस्टिटट्यूशन्स ऑफ एमिनन्स’मध्ये (आयओई) समावेश करावा, अन्यथा जावडेकरांविरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येईल.
कल्पेश यादव, अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

रिलायन्स फाउंडेशनच्या प्रस्तावित जिओ इंस्टिट्यूटला काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून इंस्टिट्यूट ऑफ एमिनन्सचा म्हणजेच उच्च शिक्षण संस्थेचा दर्जा दिला आहे. मात्र ही इस्टिट्यूट अस्तित्त्वातच आली नसल्याचेही समोर येते आहे. याबाबत ही संस्था नेमकी कुठे आहे याबाबत मंत्रालयाला विचारणा केली असता मंत्रालयाकडून आधी पुणे व नंतर मुंबई असे उत्तर देण्यात आले. मात्र या दोन्ही ठिकाणांबाबत मंत्रालय ठाम नव्हते. त्यामुळे जी इंस्टिट्यूट कुठे आहे, अस्तित्त्वात आहे की नाही याचा मंत्रालयालाच पत्ता नसताना अशा इंस्टिट्यूटचा सर्वोकृष्ठ संस्थेचा दर्जा कसा दिला जातो असा प्रश्‍न आता विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जात आहे. भाजप कसे उद्योगपतींशी निगडित आहे, ते कसा त्यांचा फायदा करून देतात हे या निमित्ताने समोर आल्याची टीका समाजमाध्यमातून मोठ्या प्रमणात केली जात आहे. यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जात आहे.
याचा विरोधी पक्षांनीही खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली असून पुणेरी भाषेत पुण्यात यावर टीका सुरु झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष कल्पेश यादव व कार्यकर्त्यांनी सध्या शहरातील अेनक ठिकाणी जिओ इंस्टिट्यूट शोधा व बक्षीस मिळवा अशा प्रकारचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स विद्यापीठ गेट, महापालिका कार्यालय, फर्ग्युसन कॉलेजसमोर लावण्यात आले आहेत.

आम आदमी पक्षाकडूनही आरोप
आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनीही आक्षेप घेत काही आरोप केले आहेत. किर्दत म्हणाले, ज्या निकषावर सरकारने जिओ इन्स्टिट्यूटला निवडले आहे त्यातील दोन निकष अत्यंत धोकादायक आहेत. एक म्हणजे पुरस्कृत करणाऱ्या संस्थेमधील व्यक्तीची मालमत्ता 500 कोटी असणे आवश्‍यक आहे. या निकषावर देशामधून 11 प्रस्ताव आले आहेत. या नव्या पद्धतीने देशातील दर्जेदार उच्च शिक्षण हे या अतिश्रीमंत व्यक्तींच्या हातात देण्याचा डाव आहे. तसेच या संस्था उभारणीसाठीच्या अटीप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील नव्हे तर इतर क्षेत्रातील अनुभव गृहीत धरला गेला आहे. या संदर्भातील आदेश 29 ऑगस्टला 2017 काढले गेले आणि केवळ 15 दिवसांत म्हणजे 12 सप्टेंबर 2017 ला मुकेश आणि निता अंबानी यांनी ही संबंधित कंपनी नोंदणी केली. यामुळेच हे सर्व अंबानी कुटुंबाच्यासाठी केले गेले या शंकेला वाव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)