‘जिओ’मध्ये 80 हजार तरुणांना रोजगाराची संधी

मुंबई : रिलायन्स जिओ कंपनी रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहे. येत्या वर्षात जिओ तब्बल 80 हजार तरुणांना नोकरीची दालनं खुली करणार आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार जणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवल्याचे जिओचे मुख्य एचआर ऑफिसर संजय जोग यांनी सांगितले.

रिलायन्स जिओने देशभरातील सहा हजार महाविद्यालयांसोबत टायअप केलं आहे. यामध्ये तंत्र महाविद्यालयांचाही समावेश आहे. यापैकी काही संस्थांमध्ये इंडस्ट्रीशी निगडीत अभ्याक्रम चालतात. त्यामुळे विद्यार्थी थेट कंपनीत काम करण्यास पात्र ठरतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुनही काही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. 60 ते 70 टक्के नियुक्त्या या कॉलेज किंवा कर्मचाऱ्यांच्या रेफरन्सने केल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)