जिओकडून प्रतिस्पर्धी कंपन्यांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा !

नवी दिल्ली: रिलायन्स जिओने आपल्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या कंपन्यांना व्हॅलेटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कंपन्यांमध्ये एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया यांचा समावेश असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शुभेच्छा संदेश पोस्ट केला आहे.
रिलायन्स जिओ बाजारपेठेत उतरल्यापासून एअरटेल, वोडाफोन आणि आयडियासोबत प्राईस वॉर सुरु आहे. अशातच जिओने शुभेच्छा संदेश देणारे ट्‌वीट करुन एकच धक्का दिला आहे.  पण जिओच्या या ट्विटला इतर कोणत्याही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये इंटर कनेक्‍टिव्हीटी पॉईंटस्‌ वरुनही वाद सुरु आहे. इंटर कनेक्‍टिव्हीटीच्या मुद्द्यावरुन रिलायन्स जिओने टेलिकॉम रेग्यूलेटरी ऍथोरिटी ऑफ इंडिया(ट्राय)कडे धाव घेत गेल्यावर्षी ऑक्‍टोंबरमध्ये तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत ट्रायने एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन कंपनींना 3150 कोटींचा दंड ठोठावला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)