जिंती तलावाच्या रस्त्याला जंगलाचे स्वरूप

कराड – जिंती ता. कराड येथील तलावाच्या सांडव्याला गेले अनेक दिवस लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी. तसेच तलावाच्या भिंतीवर आणि तलावाकडे येणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडे तोडण्याची मागणी लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतची माहिती अशी जिंती तलावाच्या सांडव्याला गेली अनेक दिवस गळती लागली आहे. तर गेल्या 10 वर्षांपासून भिंतीवरील वृक्ष न तोडल्याने त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे. झाडे मोठी झाल्याने त्याच्या भिंतीलाही धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा याबाबतची मागणी करूनही संबंधितांनचे दुर्लक्ष होत असल्याची बाब ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून दिली होती.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे सांडव्याची भिंत आणखी खचली असून सांडवा लिकीज झाल्याने तलावातील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. तात्काळ दुरुस्ती न केल्यास सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी वाया जाणार आहे.
सविस्तर माहिती व तलावाचे फोटोग्राफ पाहून तलावाची प्रत्यक्ष पाहणी करावी व त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी कांबळे यांनी सांडव्यावर वाढलेल्या वृक्षतोडी बाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी जिंतीचे पोलीस पाटील संतोष पाटील, पाटबंधारे विभागाचे पाटील, हणमंत खराडे, अशोक लामणे यांची उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)