जाहीर केलेला निधी देणारच ! हा आमचा शब्द- रावसाहेब दानवे

नगर: सर्वांच्या मेहनतीने व योगदानाने नगरची महानगरपालिका ताब्यात आली आहे. मोठ्या विकास कामं करतात सरकारच्या मदतीची गरज असते. ही मदत राज्य सरकारकडून नक्की मिळणार आहे. तशी मी जाहीर सभेतून घोषणाही केली आहे. मात्र ती केवळ निवडणुकीपुरती घोषणा नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. या आधी राज्यात जिंकलेल्या प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून शेकडो करोडो रुपयांचा निधी दिला आहे. नगरला जाहीर केलेला निधी देणारच हा आमचा शब्द आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी केली.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे शुक्रवारी सायंकाळी नगरला आले होते. रात्री उशिरा त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यालयास भेट दिली. तुतारीच्या निनादात मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने खासदार दानवे यांचे महानगरपालिकेत फटाक्‍यांच्या अतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले आदी प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते नूतन महापौर बाबासाहेब वाकळे व व उपमहापौर मालन ढोणे यांनी सर्वांचे स्वागत केले विठ्ठल-रुक्‍मिणीची मूर्ती भेट देवून यावेळी यावेळी खासदार दानवे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कर्जतचे नगरध्यक्ष नामदेव राउत, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी नगरसेवक रवींद्र बारस्कर, स्वप्नील शिंदे, मनोज कोतकर, किशोर वाकळे, गणेश ननावरे, ताठे, संजय ढोणे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा.दानवे पुढे म्हणाले, राज्यात नगर व धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मात्र विविध कारणांनी नगरची निवडणूक राज्यात गाजली. मी स्वतः नगरला आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस नगरला येऊन प्रचार केला. स्वबळावर लढलो वातावरणनही चांगले होते, मात्र अपेक्षित तेवढे यश मिळाले नाही. अजून थोड्या जागा भाजपला मिळाल्या पाहिजे होत्या. मात्र आहे त्या परिस्थितीत इतरांची मदत घेऊन भाजपाची सत्ता मिळवली आहे. सर्वांच्या मेहनतीने व योगदानाने महानगरपालिका ताब्यात आली आहे. आम्ही निवडणुकीवर नजर ठेवून होतो. येथे काय होणार आहे हे आधीच कळल होत. म्हणून आमची स्टेॅटेजी आम्ही आधीच ठरली होती.

खासदार गांधी, आमदार कर्डिले यांच्या संपर्कात होतो. आता सत्ता मिळाली असली तरी अल्पमतातील सरकार चालवतांना कशी कसरत करावी लागते याची मला चांगली जाणीव आहे. त्यामुळे ही कसरत करत तुम्हाला कामे करून गावात सुधारणा कराव्या लागणार आहेत. तुम्हाला महानगरपालिकेचा कारभार नीट करावा लागेल. प्रथमच तुम्ही महापौर-उपमहापौर च्या खुर्चीवर बसले आहात. म्हणून महानगरपालिका व्यवस्थित समजून घ्या, वसुलीवर व आवक वाढवण्यावर भर द्या, काटकसरीने कारभार करून नागरिकांच्या गरजा पूर्ण करा. अल्पमतात असले तरी बहाद्दुरी करून दाखवा. शांततेने संयमाने पक्षातील व पाठिंबा देणारे बाहेरील नगरसेवक, नेते मंडळी सांभाळा. सर्वांच्या सल्ल्‌याने कामे करून हा कारभार चोख करावा लागेल. असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले महानगरपालिकेच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हे कोणालाही खरं वाटत नव्हतं. जे शक्‍य नव्हतं ते सर्वांनी करून दाखविले. आता भारतीय जनता पार्टी कडे सत्तेची खुर्ची आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक भारतीय जनता पार्टी कडे आशेने पाहत आहे. शहराच्या विकासासाठी विशेष निधीची फार गरज आहे. या आधीच्या शिवसेनेच्या महापौरांनी फक्त घोषणांच्या वल्गना करत पोकळ आश्‍वासने दिली. त्यामुळे कामे झाली नाहीत. तुम्ही दिलेला शब्द पाळणारे पाळणारे आहात. त्यामुळे नगरच्या महानगरपालिकेला नक्की भरघोस निधी द्याल याची आम्हास खात्री आहे. तुम्ही म्हणाल तसे व अपेक्षित असेच चांगले काम आम्ही करून दाखवू अशी ग्वाही देतो.

प्रस्ताविकात सुरेंद्र गांधी म्हणाले, प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हाताला खरंच मोठे यश आहे. म्हणूनच त्यांच्या आशीर्वादानेच महानगरपालिका ची सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळाली आहे. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले यांनी योगदान यासाठी दिली आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. सूत्रसंचालन स्वप्नील शिंदे यांनी केले, तर आभार उपमहापौर मालन ढोणे मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)