जाहिरात फलकांना परवानगी बंधनकारक

पिंपरी – पुणे येथे शुक्रवारी (दि. 5) एक जाहिरात होर्डींग खाली कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जाहिरात फलकांना परवानगी घेणे बंधनकारक करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला केल्या.

यासंदर्भात महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी आकाश चिन्ह परवाना विभागाचे अधिकारी व जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

-Ads-

या बैठकीत सर्व जाहिरात एजन्सीजनी शहरात परवानगी शिवाय कोणतेच होर्डिंग लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये जूनमध्ये पुनावळे व मोशी येथे होर्डींगच्या दुर्घटनेत दोनजण मृत्यूमुखी पडले आहेत. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये व जाहिरात फलक नागरिकांना धोकादायक ठरू नयेत यासाठी संबंधित जाहिरात एजन्सींनी सर्व नियमांचे पालन करत परवानगी घेऊनच फलक उभारावेत. तसेच हे फलक लावण्यासाठी एक ठराविक धोरण तयार करण्यात यावेत.

अनधिकृत फलक काढून टाकण्यासाठी तातडीने एक समिती नेमण्यात यावी. शहरातील सर्व धोकादायक फलकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून बंदोबस्त मागवण्यात यावा. अनधिकृत फलकांवर कारवाई केल्यास महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल, असेही बैठकीत सूचित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)