जाहिरात धोरणाबद्दल सत्ताधाऱ्यांची पंचाईत

प्रशासनानेच स्थायी समितीपुढे ठेवला फेरविचार प्रस्ताव

पुणे – स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या आणि स्थायी तसेच मुख्यसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, यासाठी महापालिका प्रशासनानेच स्थायी समितीकडे प्रस्ताव दिल्याने सत्ताधारी पक्षाची पंचाईत झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील महिन्यात मुख्यसभेत गोंधळात कुठल्याही चर्चेशिवाय भाजपने गडबडीत मंजूर केलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान होणार असल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिल्याने सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे आयुक्तांवर पुन्हा एकदा संतापले. अखेर स्थायी समितीत यावर मतदान होऊन फेविचाराचा प्रस्ताव एक महिना पुढे ढकलण्यात आला.

स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या जाहिरात धोरणाला डिसेंबरमध्ये एकाच दिवशी स्थायी समितीमध्ये आणि त्याचदिवशी झालेल्या मुख्यसभेत भाजपने बहुमताच्या जोरावर मान्यता दिली. या धोरणानुसार महापालिकेला 60 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळेल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला होता. परंतु या धोरणामध्ये महापालिका स्तरावर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. या सुधारीत धोरणानुसार महापालिकेला 150 ते 175 कोटी रुपये उत्पन्न मिळेल. त्यामुळे मागील महिन्यात स्थायी समिती आणि मुख्यसभेने मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करावा, असा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीपुढे ठेवला होता.

स्थायी समितीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी फेरप्रस्ताव मांडताना महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल याचीही माहिती सदस्यांना दिली. परंतु त्याचवेळी बैठकीमध्ये दाखल झालेले सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी “आम्ही मंजूर केलेले प्रस्ताव तुम्ही रद्द कसे करता. तुम्ही दादागिरी करता,’ असे आरोप आयुक्तांवर करण्याला सुरूवात केली. या गोंधळातच “यापूर्वीचा प्रस्ताव खंडीत करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवावा आणि महापालिका आयुक्तांनी नव्याने दिलेला फेरप्रस्ताव मंजूर करावा,’ अशी उपसूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी दिली. यावर मतदान होऊन फेप्रस्तावावरील निर्णय एक महिना पुढे ढकलण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)