आ. दीपकराव चव्हाण : पाडेगाव येथे भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ
लोणंद, दि. 15 (प्रतिनिधी) – पाडेगाव, ता. फलटण येथे दलितवस्ती सुधार योजनेतून सहा लाख रूपयांची भूमिगत गटार योजनेच्या भूमिपूजन फलटणचे विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाडेगाव येथील दलितवस्तीची मागणी असलेल्या भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचे आभार मानण्यात आले.
कामाच्या उद्घाटनानंतर माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पाडेगावच्या सरपंच सौ. स्मिताताई खरात यांनी आमदार दीपकराव चव्हाण यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खरात यांनी आमदारांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच नितिनभैया जगताप यांचाही सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार दीपकराव चव्हाण यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच “जाहिरात बाजी” करणाऱ्यांना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा इशारा दिला. यासाठी फलटण तालुक्‍यातील जनतेने रामराजे नाईक निंबाळकर यांना भक्कम साथ दिली पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो. कारण 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण असा दृष्टीकोन असलेला व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा हा पक्ष आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी पाडेगावच्या सरपंच स्मिताताईं खरात, पंचायत समिती सदस्या रेखाताई खरात, तृप्ती लकडे, बाबासाहेब खरात, राजेंद्र गोरे, भुजंगराव मोहिते, तानाजी कोकरे, तुळशीराम ताम्हाणे, भानुदास अडसुळ, प्रविण ढावरे, सोमनाथ खरात, ग्रामविकास अधिकारी शिवाजी राऊत, राजेश खरात, बिपीन मोहिते, नितीन जगताप, बापू ढावरे, सूर्यकांत खरात, शंकरराव वाघ, दिलीप बागडे, धीरज काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)