जाहिरातबाजीसाठी सरकार नेमणार 64 जाहिरात एजन्सी

मुंबई – राज्यावर कोट्यावधी रूपयांचा असलेला कर्जाचा डोंगर, तिजोरीत पैसा नसल्याने विकासकामांना लावलेली कात्री, सातवा वेतन आयोगाप्रमाणे अद्यापही सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी दिलेली नसताना फडणवीस सरकारने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा प्रचंड धसका घेतला आहे. या निवडणूकीची आतापासूनच भाजपाने तयारी केली असून त्यासाठी सरकार व पक्षाने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी करीत जाहिरातबाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल 64 खासगी जाहिरात एजन्सी नेमण्यात येणार आहेत.

राज्यात शिवसेना व भाजप सत्तेत आहे. मात्र, सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपविरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच शिवसेनेने आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपची चांगलीच तंतरली आहे. त्यातच कर्नाटकमध्ये पैशाचा खेळ यशस्वी न झाल्याने तेथे सत्तास्थापन करता आली नाही. त्याचा धसका भाजपाने घेतला आहे.
या पाश्वभूमीवर भाजपाने आतापासूनच आगामी निवडणूकीची तयारी केली आहे. त्यासाठी गेल्या साडे तीन वर्षांमध्ये केलेली कामे, लोकोपयोगी घेतलेले निर्णय, पक्षाची धोरणे आदी कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई, पुणे, कोकण, संभाजीनगर, नागपूर, अमरावतीमधील 64 खासगी जाहिरात कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांमार्फत सार्वजनिक कार्यक्रम आयोजन करण्यापासून सोशल मिडीया, रोड शोची जबाबदारी या कंपन्यांवर सोपवण्यात येणार आहे.

यासाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चौदा प्रकारच्या जाहिरात करण्यापासून अगदी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि निवेदनाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या खासगी जाहिरात कंपन्या विविध माध्यमांच्या माध्यमातून भाजपची जाहिरातबाजी करणार आहे. हा सर्व पैसा करदात्या नागरिकांच्या खिशातून जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)