जाहिरातबाजीवरील सरकारची उधळण रोखा…

उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई –  सरकारची तिजोरी रिकामी असताना केंद्र तसेच राज्यातील पक्षाची प्रतिमा वाढविण्यासाठी आणि पक्षीय नेत्यांना मोठे करण्यासाठी विद्यामान सरकारकडून जाहिरातबाजीवर होणारी कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी रोखावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वृत्तपत्रांच्या “एडीटर फोरम’ या संघटनेच्यावतीने ऍड. सतीश तळेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची न्या. शंतनू केमकर आणि एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दखल घेऊन राज्य सरकार, महापालिका, सिडको, एमआयडीसी यांच्यासह प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सिडको तसेच एमआयडीच्या कार्यक्रमाची करण्यात आलेल्या कोट्यावधी रूपयांच्या जाहिरातीच्या पार्श्‍वभूमीवर “एडीटर फोरम’ या वृत्तपत्राच्या संघटनेने ही याचिका दाखल करताना वृत्तपत्रांना जाहिरात देण्याच्या सरकारच्या धोरणालाच जोरदार आक्षेप घेतला आहे. केवळ सरकारला आणि पक्षाला पूरक अशी वृत्तप्रसिध्द करणाऱ्या बड्या वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जातात असा आरोप याचिकेत केला आहे. अशा प्रकारे केवळ मर्जीतील वृत्तपत्रांना जाहिराती देऊन पत्रकारितेचे स्वातंत्र धोक्‍यात येण्याची भीतीही याचिकेत व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)