जाहरवीर गोगादेव जन्मोत्सवनिमित्त निशाण मिरवणूक

सासवड- सासवड येथील समस्त वाल्मिकी समाजाच्या वतीने सलग सातव्या वर्षी श्री जाहरवीर गोगादेव जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक अजित जगताप, प्रवीण भोंडे, खाजा बागवान आदींच्या हस्ते वीर गोगादेव यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुणे येथील भारत, दिनेश, गोपाळ, कालुभगत रमेश भगत, रितेश आणि कैलाश हे निशाण आखाडे मुख्य मिरवणुकीत सामील झाले होते.
वीर गोगादेव मंदिरात महाआरती, महापूजा, भजनसंध्या आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व आखाडा प्रमुखांचा संजय जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी समाजाचे रोमीन चव्हाण, नगरसेवक प्रवीण भोंडे, सचिन भोंडे, दादा भुजबळ, शेखर राजगुरू उपस्थित होते. जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, संजय राठोड, सुनील राठोड, कैलास चव्हाण, अनिल राठोड, दिपक चव्हाण, विकास राठोड, शाम राठोड व ताराचंद सोळंकी आदींनी सोहळ्याचे संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)