जास्त धावा करण्याची गरज- मिकी आर्थर

सेंचुरीयन: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका बुधवारपासून सुरु होत आहे. पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना त्याच्या गोलंदाजी विभागावर पूर्ण विश्वास असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामने जिंकायचे असतील तर फलंदाजांनी धावांचा डोंगर रचण्याची गरज आहे असे विधान केले आहे.

आपल्या संघाच्या बलस्थानांविषयी बोलताना आर्थर म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील वातावरण हे वेगवान गोलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे आमच्या संघातील गोलंदाज प्रत्येक कसोटीमध्ये 20 फलंदाज बाद करू शकतील याचा मला पुर्ण विश्‍वास आहे. दोन्ही संघाची ताकद ही गोलंदाजीचा आहे त्यामुळे आम्हाला ही कसोटी मालिका जिंकायची असेल तर फलंदाजांनी चांगल्या धावा करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका अध्यक्षयीय संघ यांच्यात झालेल्या एकवेम सराव सामन्यात देखील पाकिस्तानने विजय मिळवाल आहे. सराव सामन्यात अब्बास दुखापत ग्रस्त असल्याने खेळला नव्हता. परंतु, त्याच्या अनुपस्थितीत देखील पाकिस्थानकडे मोहमद आमिर, हसन अली शाहीन आफ्रिदी आणि फिरकीपटू यासीर शाह यांनी चांगला खेळ करुन सामना जिंकून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)