जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा

अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा : जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल

सातारा – कोणताही दिव्यांग मतदार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी मतदानाच्या दिवशी सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे. येथील यशवंतराव चव्हाण इनस्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात अपंग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-

या कार्यक्रमात दिव्यांग मतदारांचा सत्कारही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते. दिव्यांग व्यक्ती अनेक अडचणींवर मात करुन सर्वसामान्यांप्रमाणे आपले जीवन जगत असतात हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल पुढे म्हणाल्या, मतदार नोंदणी कार्यक्रमात यावर्षी 1 लाखाहून अधिक नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे, ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

कोणताही दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी कोणतीही अडचण येत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधवा निश्‍चित त्या सोडविल्या जातील. जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण करीत आहे अशा दिव्यांग मतदारांनी आपले नाव मतदार यादीत येण्यासाठी नावाची नोंदणी करावी. तसेच ज्या दिव्यांग मतदारांना मतदान ओळखपत्र मिळाले आहे अशा दिव्यांग मतदारांनी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी शेवटी केले.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणुका हे घोषवाक्‍य जाहीर केले आहे. 2019 ची लोकसभेची निवडणूक दिव्यांग मतदारांसाठी महत्वाची राहणार आहे. ज्या दिव्यांग मतदारांना जानेवारी 2019 मध्ये 18 वर्ष पूर्ण होणार आहेत अशांनी बीएलओ, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेसवी संस्था, तहसील कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज क्र. 6 भरुन द्यावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगाना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी वाहनाची, अंध व्यक्तींसाठी मतपत्रिका ब्रेल लिपीत, ज्यांची दृष्टी कमी आहे अशांसाठी चांगल्या लाईटची सुविधा यांच्यासह विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे.

दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त नावे नोंदविण्यासाठी दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रचार व प्रसिद्धी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी प्रास्ताविकात केले. या कार्यक्रमास दिव्यांग मतदार, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)