जावळीतील विद्यार्थीनींना आदेशानंतर मिळाला एसटी मोफत पास

File photo

सातारा – अति दुर्गम व मागासलेल्या जावळी तालुक्‍यात सुमारे आठ हजार मुली दहावी, बारावीचे शिक्षण घेत आहेत. काहींच्या घराशेजारी दहावी व बारावी शिक्षणाची सुविधा नसल्याने त्यांना इतर विद्यालय, महाविद्यालयात शिक्षणासाठी जावे लागते. गरीब मुलींना एसटी शिवाय पर्याय नाही.

अशा मुलींना एसटीची वाट पाहण्यातच वेळ घालवावा लागतो. त्यांच्यासाठी पुण्यश्‍लोक आहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत एसटी पास योजनेचीची घोषणा केली व सदर बाबतीचे शासकीय परिपत्रक दि.15 ऑक्‍टोबरमध्ये काढले व त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. असे असताना जावली तालुक्‍यातील मेढा एसटी आगारकडून दिरंगाई होत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेढा येथील वेण्णा महाविद्यालयात प्रशासनाने पाठपुरावा करून सातारा येथे विभागीय वाहतुक अधिकारी कुलकर्णी यांची भेट घेतली व सदर योजनेची माहिती घेऊन मेढा एसटी आगारातील अधिकारी यांना त्वरित मुलींना मोफत पास देण्याची सूचना केली. त्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पाटील व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केला.
जावळी पास नावाने फोटो सेव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)