जावळीतील चार गावांचा बहिष्काराचा इशारा

पुनर्वसन करण्याची मागणी, हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीने ग्रामस्थ हवालदिल

ठोसेघर – जावळी तालुक्‍यातील सहृयाद्री व्याघ्र प्रकल्पात मोडणाऱ्या अति दुर्गम भागातील कारगाव ग्रामपंचायती अंतर्गत मोडणाऱ्या पिसाडी, कात्रेवाडी, अंबवडे, कारगाव या गावांची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी या गावांमधील नागरिकांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. वन्य प्राण्यांची वाढती दहशत व मुलभूत सोयी सुविधांची वानवा यामुळे स्थानिक ग्रामस्थ हतबल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून पुनर्वसन करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात येत आहे. परंतु, शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारगाव ग्रामपंचायतील गावे ही मुळातच बफर झोनमध्ये मोडत असल्यामुळे या परिसरात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा मुक्त वावर आहे. हिंस्त्र प्राण्यांकडून स्थानिक ग्रामस्थ व पाळीव प्राण्यांवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ले होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली वास्तव्य करत आहेत. अति दुर्गम भाग, बफर झोन व लोकप्रतिनिधींचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे या गावांपर्यंत दळणवळणासाठी कोणतीही सुविधाच आज पर्यंत उपलब्ध नाही. गावापर्यंत पोहचण्यासाठी ग्रामस्थांना एक ते दीड तास घनदाट जंगलातून हिंस्त्र प्राण्यांचा दहशतीखाली जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. किंवा तब्बल दोन तासांचा बोटीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे आजारी रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला यांना आरोग्याचा गंभीर प्रश्‍नाचा सामना करावा लागतो.

रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण, विज यासारख्या मुलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे. वनविभागाच्या जाचक अटींमुळे ग्रामस्थांना उदरनिर्वाह करणे ही मुश्‍किल झाले आहे. कास पुष्प पठारावरील फुलांचे जतन करण्यासाठी शासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात असताना सामान्य नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनकडून केली जात आहे. लोक प्रतिनिधींकडूनही दुर्लक्ष होत असल्याने येणाऱ्या निवडणुकीवर या गावांतील ग्रामस्थांकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कारगाव, पिसाडी, कात्रेवाडी, अंबवडे मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)