जावळवाडी येथे पाण्याअभावी पिके गेली वाळून

कण्हेर केनॉलमधून पाणी सोडले नसल्याचा परिणाम

नागठाणे – सातारा तालुक्‍यात शेतीसाठी सिंचनासाठी विसंबून असणाऱ्या कण्हेर केनॉलवरील वर्णे, तासगाव, अपशिंगे मंडलातील सुमारे 30 गावांतील शेतीला पावसाळा संपल्यापासून आज अखेर कण्हेर केनॉलमधून पाणी सोडले गेले नसल्याने ऊस पिकासह इतर पिके वाळून गेली असून लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. बॅंका, सोसायट्या मार्फत कर्जे घेऊन शेतकऱ्यांनी फुलवलेली शेती वाळून जात असताना शेतकऱ्यांचे तोंडाचे राळे सुकले आहेत. या नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून चर्चेत येत आहे.

जाधववाडी (ता. सातारा) येथील केनॉल पुलाचे दुरुस्तीचे काम संथगतीने चालू असल्याने पावसाळ्यापासून या पुला पुढील असणाऱ्या वर्णे, तासगाव, अपशिंगे मंडलातील अंगापुर, वर्णे, धोंदेवाडी,टिटवेवाडी, फत्यापुर, कामेरी, लिंबाची वाडी, जावळवाडी, खोजेवाडी, अपशिंगे, मत्यापुर आदी गावांना आज अखेर पाणी नसल्याने ऊस पिकाबरोबर इतर पिके जळून गेली आहेत तर रब्बी पिकाची पाणी नसल्याने मशागत होऊ शकली नाही. यामुळे या सिंचनावरती अवलंबून असणाऱ्या रब्बी पिकाच्या पेरण्या संपुष्टात आल्या आहेत.

या प्रश्नावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा सातारा येथील पाठबंधारे कार्यालयावर नेला होता त्यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाटाच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र आज अखेर शेतकऱ्यांना पाणी स्वप्नात पहावे लागत आहे. झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई पाटबंधारे विभाग देणार काय? असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)