जावली तालुक्‍यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

मेढा ः ध्वजारोहण करताना रोहिणी आखाडे. समवेत इतर मान्यवर. (छाया : शशिकांत गुरव)

मेढा, दि. 16 (प्रतिनिधी) – जावली तालुक्‍यात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे मुख्य शासकीय समारंभ पार पडला. तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस, विद्यार्थी व नागरिकांनी तिरंग्याला सलामी दिली.
यावेळी सभापती अरुणा शिर्के, उपसभापती दत्तात्रय गावडे, जि. प. सदस्य दीपक पवार, अर्चना रांजणे, पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी संताजी पाटील, सपोनि जीवन माने,वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, माजी सभापती बापूराव पार्टे, मोहनराव शिंदे, माजी उपसभापती रवींद्र परामणे, हणमंतराव पार्टे, मेढा नगरीचे सर्व नगरसेवक, विविध खात्यांचे अधिकारी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. नगर पंचायत मेढा व जावली पंचायत समितीत सभापती अरुणा शिर्के व उपसभापती दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजस्तंभाचे पूजन नगराध्यक्ष द्रौपदा मुकणे व उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद मेढा शाळेत मुख्याध्यापक सुरेश शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वेण्णा विद्या मंदिर येथे मुख्याध्यापकांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. मेढा न्यायालय, पोलीस स्टेशन, विविध सहकारी संस्थानमध्ये त्या-त्या प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मेढ्यातील पेंटर किसन साळुंखे यांनी रंगांनी विद्यार्थ्याच्या गालावर तिरंगा काढून अनोखी देशसेवा केली तर ध्वरारोहणानंतर नागरिकांनी गरमागरम जिलेबीचा आस्वाद घेतला. केवळ मेढा शहरात स्वातंत्र्यदिनी अडीच ते तीन लाखांची जिलेबी आणि पापडी विक्रीत उलाढाल होते. पावसाची तमा न बाळगता नागरिकांनी विविध कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)