जावली तालुक्‍यात स्वाइन फ्लूचे थैमान

सहाजणांना लागण तर एकाचा मृत्यू

मेढा – जावली तालुक्‍यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून सहाजणांना त्याची लागण झाली होती. यातील कुसुंबी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयसिंग चिकणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, उर्वरित जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. जावली तालुक्‍यात ओझरे येथे एक, करंदी येथे दोन, आनेवाडी, सर्जापुर, कुडाळ येथे प्रत्येकी एक अशा सहाजणांना स्वाइन फ्लूची झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने हे रुग्ण बरे झाल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले. परंतु, स्वाईन फ्लूची लागण झालेले चिकणे परगावी गेले होते. तिथूनच साताऱ्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते व तिथून पुणे येथे त्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या बाबतीत अधिक सांगता येणार नसल्याचे मोहिते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)