जावली तालुक्‍यात पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

कुडाळ – जावली तालुक्‍यातील कोलेवाडी येथील काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. नवनाथ रांजणे व सिमा रांजणे असे या दांपत्याचे नाव असून सुदैवाने या घटनेत दोघांचेही प्राण वाचले आहेत. दरम्यान, आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप समजलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळच्या सुमारास नवनाथ रांजणे यांनी गळफास तर सिमा रांजणे यांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जावली तालुक्‍यात पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न मात्र, या घटनेची माहिती मिळाल्याने घटनास्थळावरील उपस्थितांनी तात्काळ दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. नवनाथ रांजणे यांच्यावर पाचवड (ता. वाई) येथील खाजगी रुग्णालयात तर सिमा रांजणे यांच्यावर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)