जावलीच्या शैक्षणिक क्षेत्रात “आनंद’चे मोलाचे योगदान

मेढा ः सविता शिंदे यांचे अभिनंदन करताना भोसले, विजय सपकाळ व इतर.

मेढा, दि. 19 (प्रतिनिधी) – इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीचे अध्ययन सहज सुलभ पध्दतीने घेता यावे व या विषयात गोडी निर्माण व्हावी या हेतूने बॉम्बे कम्युनिस्ट पब्लिक ट्रस्ट यांनी सॉफ्टवेअर तयार केले असून आनंद सामाजिक संस्थेच्यावतीने या उपक्रमाची तालुकास्तरावर अंमलबजावणी केली जात आहे.
महाराष्ट्र शासनाअंतर्गत जिल्हा स्तरावरून हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर सर्व शाळांना मोफत देण्यात आले. पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व पेज टु पेज कृतीयुक्त मनोरंजन पध्दतीने चित्रमय सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे मुलांना इंग्रजी विषयाची भीती कमी होऊन मुलांची आकलन क्षमता वाढत आहे. तालुक्‍यातील बहुतांशी शाळेत हे सॉफ्टवेअर प्रोजेक्‍टच्या मदतीने दाखवले जात असून त्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंद सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता शिंदे यांनी जावली तालुक्‍यातील शाळांना भेटी दिल्या असता मुलांना सॉफ्टवेअर किती उपयुक्त आहे, त्यामुळे मुलांची आकलन शक्ती कशी चांगली राहते याची माहिती दिली. या सॉफ्टवेअरमुळे इंग्रजी सफाईदारपणे बोलतात. इंग्रजीचे उच्चार तसेच विद्यार्थी कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे चुका करतात त्या सुधारण्यासाठी बीसीपीटी सॉफ्टेवेअर किती गरजेचे आहे याची माहिती दिली. भविष्यात मुले स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील. सौ. सविता शिंदे अध्यक्षा यांचे जावली गट विकास शिक्षणाधिकारी चव्हाण, विस्तार अधिकारी तोडरमल मॅडम, केंद्र प्रमुख विजय सपकाळ यांच्यावतीने आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)