जालन्यात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

जालना – शहरात सध्या बेशिस्त वाहतुकीमुळे व कासवगतीने चाललेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहन चालकांना कामावर नियोजित वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे. याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांसह सरकारी कर्मचारी व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मामा चौक, शिवाजी पुतळा, पाणीवेस, मुथा बिल्डींग, मस्तगड, बसस्थानक, गांधी चमन, शनिमंदिर आदी ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शहरात वाहतूक समस्या बिकट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)