जायकवाडी प्रकल्पाकडेचा परिसर बनलाय ऊस शेतीचे आगर….(भाग तीन )

File photo

   ज्वारीचे कोठार बनले उसाचे आगर

प्रकल्प होण्याअगोदर गोदावरी नदीकडेच्या या काळ्या कसदार जमिनीत ज्वारी हे मुख्य पीक घेतले जात असे, म्हणून या परिसराला ज्वारीचे कोठार म्हटले जात. मात्र. प्रकल्पानंतर या जमिनीवर सर्वत्र पाणी आले. मात्र, कालांतराने जलसाठ्याच्या कडेच्या गावांनी उपसा जलसिंचन योजना उभारून पाणी उपलब्धतेने ऊस हे बागायती पीक मुख्यत्वे घेतले जाऊ लागले व थोड्याच दिवसात मोठे क्षेत्र ऊस पिकाने व्यापले व आज ऊस या भागाचे मुख्य बनले. आज परिसर उसाचे आगर म्हणून ओळखला जातोय.

  प्रकल्पबाधितांना शासनाने सोडले वाऱ्यावर

या प्रकल्प निर्मितीसाठी संपादित जमीनदारांना अनेक शासकीय लाभांचा जशा पर्यायी जमिनी, प्रत्येक कुटुंबाला शासकीय नोकरीची हमी, जलसाठ्यावर अधिकार, नोकरीत 5% आरक्षण या सर्व उपाययोजना प्रकल्पबाधितांसाठी राबविणे सरकारचे आद्य कर्तव्य होते. मात्र, झाले उलटे. आजतागायत अनेक शेतकरी पर्यायी शेतजमिनीला पारखे असून, संपादित क्षेत्राच्या निम्मे क्षेत्रही शासनाकडून बदली मिळाले नसून प्रकल्पानंतर आजपर्यंत संपूर्ण शासकीय फायदे जरी मिळाले नसले तरी प्रकल्पग्रस्त म्हणून मात्र सर्वत्र हिणवले जाते आणि पिढ्यान्‌पिढ्या कपाळावर धरणग्रस्त हा शिक्का मात्र दिला हे एक उघड सत्य.

   शंकर मरकड

भावीनिमगाव, ता. शेवगाव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)