जामीन नव्हे, जमीन घेऊ

चाकण/महाळुंगे इंगळे-पुनर्वसन झालेले नाही, पर्यायी जमिनी मिळालेल्या नाहीत, अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत, असे असतानाही न्याय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करून शासन जबरदस्ती करू पाहात असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्त सर्व शेतकऱ्यांना लगेच अटक करा, आम्ही तुरुंगात बसू. जामीन घेणार नाही; मात्र आमची हक्काची जमीन परत घेऊ, अशी भूमिका रविवारी (दि. 15) सकाळी अकरा वाजता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतली.
रविवारी भाम आसखेड प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने चाकण पोलीस ठाण्यावर जमा झाले होते. यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जि. प. सदस्य शरद बुट्टेपाटील, माजी जि. प. सदस्य अनिल (बाबा) राक्षे, पंचायत समितीचे उपसभापती अमोल पवार, सोमनाथ मुंगसे आदींचाही सहीा होता. भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्यानंतर चाकण पोलिसांत सुमारे शंभर प्रकल्पग्रस्तांवर मागील आठवड्यात (दि. 7) गुन्हे दाखल केले होते. यानंतर सोमवारी (दि. 9) कडेकोट पोलीस बंदोबस्तात धरण प्रशासनाने भामा आसखेड धरणाच्या आयसीपीओमधून नदीपात्रात 800 क्‍युसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी केला. धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी चाकण पोलिसांत दिलेली तक्रार खोटी असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी मेमाणे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत शेतकऱ्यांनी सह्यांचे निवेदन चाकण पोलिसांना दिले. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी संबंधित सर्व शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेतली.

  • ही फिर्याद उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिली होती. त्यात मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना देविदास बांदल यांचे नाव द्यायचे होते; परंतु, मृत नामदेव बांदल यांचे नाव चुकून लिहिण्यात आले आहे. आज सकाळी 200 ते 300 धरणग्रस्त शेतकरी चाकण पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी हे गुन्हे खोटे असल्याचे म्हटले आहे. आम्ही योग्य तो तपास करून चौकशी करू. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्या आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.
    -मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक चाकण
  • मयत प्रकल्पग्रस्तावरही गुन्हा
    चाकण पोलिसांत ज्या शंभर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात आठ महिन्यांपूर्वी मयत असणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव बांदल असे गुन्हा दाखल झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेली फिर्याद खोटी असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)