‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठाला अल्पसंख्याकचा दर्जा देता येणार नाही

नवी दिल्ली – जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाला धार्मिक अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने विरोध केला असून, तसं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारकडून  दिल्ली उच्च न्यायालयात सादर करण्यात आलंय.

राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाला अल्पसंख्याकचा दर्जा दिला होता.  केंद्र सरकारने आपली बाजू मांडताना न्यायालयात सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात अजीज बाशा विरूद्ध भारत गणराज्य खटला (वर्ष १९६८) चा हवाला देत म्हटले आहे की, विद्यापीठ संसद अॅक्ट अंतर्गत येतात. त्यांना अल्पसंख्याक दर्जा देता  येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)