जामगाव झाली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत

नगर – पारनेर तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान जामगाव गावाने पटकावला असून यापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार असल्याने ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांचे वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी दिली.
ग्रामपंचायत पेपरलेस झाल्याची तपासणी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे आपले सरकार सेवा केंद्र समन्वयक आव्हाड, आपले सरकार सेवा केंद्र हार्डवेअर इंजिनियर पठारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रवीण मुंजाळ यांनी ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांचे मार्गदर्शनाखाली व लिपिक सुदर्शन खामकर यांचे सहकार्याने सर्व दप्तर ऑनलाईन केलेले आहे.
तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत झाल्याने जामगावकरांच्या शिरपेचात स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान बरोबरच आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल पंचायत समिती सदस्या सुनंदाताई धुरपते, सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, गटविकास अधिकारी तनपुरे, सभापती राहुल झावरे, उपसभापती दिपक पवार, दिनेश बाबर, सुप्रियाताई झावरे, विस्तार अधिकारी अभंग, महादेव भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)