जामखेड : ‘​​रत्नदीप​’ ​मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार 

जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा 
जामखेड : होमिओपॅथिक उपचार पध्दतीचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार आणि जास्तीत जास्त नागरिकांना यांचा फायदा व्हावा यासाठी कर्जत जामखेड तालुक्यातील पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार असल्याचे माहिती रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्करराव मोरे यांनी दिली. रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँण्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या जामखेड होमिओपँथिक मेडिकल कॉलेज मध्ये होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६३ व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष भास्करराव मोरे ,सचिव डॉ. वर्षा मोरे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे ,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोरे म्हणाले कि, होमिओपॅथी ही प्रभावी उपचार पध्द्ती असून होमिओपॅथिक उपचार पध्द्तीचा ग्रामीण भागात घरोघरी प्रसार आणि प्रचार होण्याची आवश्यकता आहे.  यासाठी प्रत्येक होमिओपॅथिक अभ्यासक्रमाच्या कॉलेज चालविणाऱ्या संस्थांनी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असून ते काम विद्यार्थी मिशन म्हणून हाती घेतले पाहिजे. जामखेड -कर्जत तालुक्यातील नागरिकांना होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा फायदा होण्यासाठी आगामी काळात पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात रत्नदीप संस्थेच्या माध्यमातून मोफत सेवा देण्यासाठी होमिओपॅथिक तपासणी व सल्ला केंद्र सुरु करणार असल्याची माहिती डॉ. भास्करराव मोरे यांनी दिली. यावेळी डॉ. वर्षा मोरे, डॉ. सुनील बोराडे, डॉ. युवराज खराडे, अविनाश पुलाटे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गावडे व मयूर पिठोरे यांनी केले तर आभार विकास जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)