जामखेड  : सांगवी येथील जि. प. प्राथमिक शाळेची ‘यशाकडे वाटचाल’

मुख्याध्यापिका ,ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे शाळेचा झाला कायापालट, विद्यार्थ्यांना लागली गोडी 
जामखेड : पूर्वी समाजाचा जि.प. शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. या शाळेत मध्यमवर्गीयांचीच मुले शिकतात. शिवाय, सरकारी शाळांत शिकविले जात नाही, असे आरोप-प्रत्यारोप होत होते. पण जामखेड तालुक्यातील सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेने कात टाकली असून मुख्याध्यापिका मीना बोडके यांच्या कल्पकतेला ग्रामस्थांनी साथ दिल्याने शाळा यशाकडे वाटचाल करत आहे.

जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सांगवी या 500 लोकवस्ती असलेल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहे यामध्ये २५ विद्यार्थी ज्ञानार्जन करून लागले. गेल्या अनेक वर्षपासून शाळा अडगळीत पडल्यासारखी होती , या शाळेच्या ३ खोल्या जीर्ण अवस्थेत आहेत. सांगवी हे नाव बहुधा संगम या शब्दावरुन पडले असावे. विंचरणा नदी व पाटोदा नदी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे छोटेसे गाव. गावात सर्व शेतीचा व्यवसाय करतात. काही लोक अलीकडे शहरात स्थलांतरीत झालेले. गावात सगळीकडे वेड्या बाभळीचे साम्राज्य, रस्ताही वेड्या बाभळीतूनच आहे.  मुख्याध्यापिका मीना बोडके यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री राम शिंदे ,जि प सदस्य सोमनाथ पाचारणे ,सभापती सुभाष आव्हाड ,पंचायत समिती सदस्य राजश्री मोरे रत्नापूरचे सरपंच दादासाहेब वारे ,उपसरपंच शाहाजी महानवर ,चेअरमन अशोक महानवर ,किसान महानवर ,देविदास साळवे गटशिक्षण अधिकारी पोपट काळे ,केंद्र प्रमुख निळकंठ घायतडक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजू महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला दोन खोल्याही मंजूर झाल्या आहेत.  शाळा आता आयएसओ मानांकन कडे वाटचाल करत आहे.

सध्या या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे २५ विद्यार्थी इ-लर्निंग डिजीटल क्लासरूमच्या माध्यमातुन शिक्षण घेत आहेत. या शाळेत विविध उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शाळेची शैक्षणिक सहल ,वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. शाळेत सकाळी नऊ वाजता डिजिटल परिपाठ घेतला जातो. मुख्याध्यापक, शिक्षक हे विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य समजतात. ग्रामस्थांतही आपुलकी निर्माण झाली. विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन यातूनही गावकऱ्यांनी भरीव आर्थिक मदत केल्याने शाळा नावारूपाला आली. त्याचबरोबर एक मूल एक झाड ही योजना राबविली.  शाळेत सिंचनासाठी ठिबकची सोय केलेली आहे. शाळेत झालेला सकारात्मक बदल ग्रामस्थांच्या लक्षात आला आणि शाळेसाठी आपण ही काहीतरी केले पाहिजे याची जाणीव झाली. गटशिक्षणाधिकारी काळे यांचेही शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मिळत होते. वरिष्ठ पातळीवर शाळेला सहकार्य मिळावायचे तर शाळेच्या समस्या तिथपर्यंत पोहचविणे आवश्यक होते. मग काय सर्वांनी एकत्र येण्याचा पर्याय म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन! त्याचंही आयोजन करायचे ठरवले. पंचायत समितीचे उपसभापती राजश्री मोरे व भाजपा जिल्हाध्यक्ष सुर्यकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळेच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व कार्यक्रमासाठी खर्च झालेली रक्कम रोख बक्षीस दिले. यावेळी जमा रक्कमेतून शाळेसाठी संगणक संच उपलब्ध करण्यात आला. देणगीदारांच्या सहकार्याने शाळेत स्वतंत्र कम्प्युटर कक्ष आणि इ लर्निंगची सुविधा केल्याचे मुख्याध्यापिका मीना बोडक, शिक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इ लर्निंगद्वारे अध्यापन केले जाते. विद्यार्थ्याची शिक्षणाची गोडी वाढण्यास ही शैक्षणिक पद्धत उपयुक्त ठरली आहे. शाळेचा परिपाठही वैशिष्टपूर्ण असतो. रोज वेगळी प्रार्थना, समूहगीताचा समावेश असतो.

प्रशासकीय बदलीने मिळालेली शाळा पाहण्यासाठी बदलीच्या दुसऱ्याच दिवशीच गेले. शाळेसमोर उभे राहताच पायाखालची जमीन सरकली असेच वाटले. मे महिन्यातील भकास उन्हाळा,तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन खोल्या की ज्या शाळेच्या आहेत अशा वाटतच नव्हत्या अन त्याही धोकादायक!अशा ठिकाणी काम कसे करायचे हा प्रश्न पडला. दिवसातील सहा- सात तास ज्या ठिकाणी रहायचे तिथे आपलं मन तरी रमलं पाहिजे? पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख घायतडक यांच्याशी चर्चा केली असता काम करत रहा बदल घडून येईल असे मार्गदर्शन मिळाले. हा विश्वास सार्थ करायचा ठरवले. अन लागले कामाला! शाळेतील आमचे सहकारी शिक्षक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच आम्ही शाळेला नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरच  – मीना बोडके, मुख्याध्यापिका सांगवी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)