जामखेड शहरात स्वच्छतागृहांची दुरवस्था

दुर्गंधीचा सहन करावा लागतो त्रास : नागरिकांच्या तक्रारी वाढल्या
जामखेड – शहरात स्वच्छ भारत अभियान राबविले. पण नगर परिषदेच्या कार्यालयाजवळच्या पुरूष स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात आता तर, भिक नको, पण कुत्रे आवर !अशी अवस्था झाली आहे. येथील परीसर घाणीने व्यापलेला आहे. या दुर्गंधीने नागरीकांच्या आरोग्यास धोकादायक अवस्था झाली आहे. येथील स्वच्छता कधीच केली जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
जामखेड शहराला चार जिल्ह्याची सरहद्द लाभल्याने खूप मोठी प्रसिद्ध बाजारपेठ मिळाली आहे. मात्र नगरपरिषदेमार्फत येथे ग्राहकांसाठी कोठेच चांगल्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली नाही. त्यांची देखभाल केली जात नसल्याने नागरिकाचे प्रचंड हाल होतात. प्रशस्त बाजार पेठ आहे. पण एकाही ठिकाणी महिला स्वच्छतागृह नाही. शनिवारी बाजार दिवशीतर महिलांची खुप अडचण होते. बाजार तळ, खर्डा चौक, मेन पेठेतील व्यापारीवर्ग नागरपरिषदेजवळील याच स्वच्छतागृहांचा वापर करतात.
शनिवारी बाजार दिवशी तर येथील दुर्गंधी रस्त्यावर पसरलेली असते. नगरपरिषदेच्या जवळच हे ठिकाण आहे. याकडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे लक्ष नाही. वृध्द, जेष्ठ नागरीकांसाठी शहरात कोठेच स्वच्छतागृह नसल्याने खुप अडचण होत आहे. नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात या शहराच्या या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना काय करणार आहेत हे एक औत्सुक्‍याने पाहाण्यासारखे आहे. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहामागे खुप जुने महिलांसाठी स्वच्छतागृह आहे. पण तेथे पाय ठेवण्यासाठी जागा नाही. तेथे स्वच्छता नसल्याने तो परीसर घाणीने व्यापलेला आहे.
शहरात विकासात्मक खुप मोठा बदल पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी लक्ष घातल्याने होवू पहात आहे; अशा वेळी शहरातील अनेक सुविधा नागरीकांना कशा प्रकारे प्रदान करता येतील. याकडे लक्ष देऊन नगर परिषदेने आपले काम करावे अशी नागरीकांची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील गटारी, रस्ते, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, साफसफाई यावर लक्ष ठेवावे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक असुविधा यावर त्वरीत उपाय योजना करण्याची जनतेतून मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)