जामखेड शहरात शिवराज्याभिषेक दिन साजरा

मल्लखांब, शस्त्रपथकाची चित्तथरारक प्रात्यक्षिके
जामखेड – येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने शहरात सोमवारी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मल्लखांब, रोपवे, शस्त्रपथक, अशी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
शहर ढोलताशांच्या आवाजाने दुमदुमून गेले होते . 24 जून रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती चौक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यानंतर खर्डा किल्ला येथे ध्वजारोहण करण्यात आले. मराठ्यांनी जेथे निजामाला पराभूत केले त्या रणटेकडी येथे सकाळी 10 वाजता शिवरायांना अभिवादन करण्यात आले. येथे वृक्षारोपणही करण्यात आले. 25 जूनला पहाटे 5 वाजता शिवरायांच्या मूर्तीवर सप्तनद्या व गडकोट किल्ल्यावरील पाण्याने अभिषेक करण्यात आला. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पेठ असे रणटेकडी प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले.
सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यास सुरुवात झाली. मिरवणुकीवर शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत महाराजांना अभिवादन केले.
मिरवणुकीत घोड्यावर मुली स्वार झाल्या होत्या. नगर येथील मुलींनी 25 ते 30 फुट अंतरावर रोपवे वरुन चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. जामखेड येथील मुलांनी मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. क्रांती ग्रुपच्या वतीने शस्त्रांचे खेळही सादर करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेली शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)