जामखेड शहरात एकत्रित मिरवणूक काढून आंबेडकर जयंती साजरी 

जामखेड :  जामखेड शहरातील समाजमंदिर मिलिंद नगर, सिध्दार्थ नगर, महात्मा फुले नगर, सदाफुले वस्ती, इंदिरा नगर आरोळे वस्ती, पंचायत समिती, बाजार समिती आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.  तसेच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये देखील जयंती साजरी करण्यात आली.  सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणुक काढण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी एकत्रित मिरवणुक काढण्यात आली आणि वेगळा आदर्श निर्माण केला गेला.

जामखेड शहरात व तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील समाज मंदिरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बुध्द वंदना घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष निखिल घायतडक, बौध्दचार्य महेंद्र घायतडक, गोकुळ गायकवाड ,शिक्षक नेते निळकंठ घायतडक, बहुजन नेते सिध्दार्थ घायतडक, अरूण जाधव, रमेश सदाफुले, विकी सदाफुले, विकी घायतडक, राजन समिंदर,  मेजर चंद्रकांत साळवे, शशिकांत ससाणे, प्रत्रकार संजय वारभोग, राहूल आहेर सुरेखाताई सदाफुले आदी बांधव उपस्थित होते.

-Ads-

महात्मा फुले नगर येथे सोमनाथ राळेभात अमित चिंतामणी यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवी सोनवणे, बौध्दचार्य अशोक आव्हाड व समाज बांधव उपस्थित होते, मिलिंद नगर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नगरसेविका विद्या वाव्हाळ व नगरसेवक गुलशन अंधारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी बापु गायकवाड राजेश वाव्हळ, राहुल आहेर, अंकल घायतडक, अमोल सदाफुले, अशोक साळवे, आण्णा घोडेस्वार आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिचौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विवेक कुलकर्णी, महेश निमोणकर, सुरेश कुलथे, विनोद उगले, भाऊसाहेब उन्हाळेे, मनिष मासाळ, दिगंबर राळेभात, मनोज घोडेस्वार, ऋषिकेश मिराशी आदी स्वंवयंसेवक उपस्थित होते. सदाफुले वस्ती येथील नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी राजू सदाफुले, महसूल अधिकारी मधुकर सदाफुले, दिपक सदाफुले, अमोल सदाफुले,  आगे गुरुजी,घोडके गुरूजी आदी समाज बांधव उपस्थित होते.

सिध्दार्थ नगर मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर सदाफुले यांनी करून अभिवादन केले. यावेळी मधुकर राळेभात, गुलाब जांभळे, संतोष पवार, प्राचार्य विकी घायतडक, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, रत्नाकर सदाफुले, शेखर घायतडक, सचिन सदाफुले, मनेश घायतडक आदी समाज बांधव उपस्थित होते. आरोळे वस्ती येथे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक व पदाधिकारी संतोष गव्हाळे, आशा ताई पवार आदी समाज बांधव उपस्थित होते.       एसटी डेपो मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आगार व्यवस्थापक वारे यांनी केले. भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, सुर्यकांत मोरे,  अशोक धेंडे, गोरख घनवट समितीचे अध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक दिगंबर चव्हाण व सर्व नगरसेवक, आगारातील अनिल सदाफुले, पप्पु घायतडक, राकेश घायतडक व  सर्वपदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जामखेड तालुका ‘राष्ट्रवादी’ चे वतीनेही  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्त जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवा नेते शहाजी राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, प्रकाश काळे, संभाजी राळेभात, हरिभाऊ आजबे, भारत चव्हाण, सुहास आव्हाड, सुनील सदाफुले, उपप्राचार्य गायकवाड, प्रा.पंडित, प्रा.आव्हाड ,संतोष राऊत ,धनराज पवार,आहिरे आदी उपस्थित होते. धार्मिक विधी बौद्धाचार्य अशोक आव्हाड आणि पत्रकार संजय वारभोग यांनी पार पाडले. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, जामखेड याठिकाणी  सभापती गौतम आण्णा उतेकर, संचालक काकासाहेब गर्जे, त्रिंबक कुमटकर, सोमनाथ सातव, विनोद नवले, सुभाष जायभाय, महादेव डुचे, अरुण महानवर, संजय वराट, मकरंद काशिद, सचिव वाहेद भाई सय्यद व कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती सकल मराठ जामखेड तालुका यांच्या वतीने सकल मराठा संघटना कार्यालयात साजरी करण्यात आली.  त्या प्रसंगी मंगेश आजबे, पांडुरंग भोसले, कुसडगांवचे सरपंच सरनोबत, तनपुरे, चेअरमन नितिन राळेभात, डॉ. कैलास हजारे, नगरसेवक  ऋषीकेश  बांबरसे, विकास राळेभात, शरद कार्ले, सचिन घुमरे, शरद भोरे, नितीन हुलगुंडे, महेश राळेभात, सुनिल जगताप, नितिन जगताप, कोल्हे सर, संतोष भोंडवे,  सनी सदाफुले, आप्पा कार्ले, मंडळ अधिकारी सुदारदास  बिरंगळ, हर्षद मुळे, राजु आजबे, शंकर पवार आदी उपस्थित होते. अशा प्रकारे शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)